Women’s Hostel Crime : महिला वसतिगृहातल्या सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या; आरोपीची रेल्वेखाली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रकाश कनोजिया (Women's Hostel Crime) हा सुरक्षा रक्षक आणि लाँड्री मॅन म्हणून वसतिगृहात काम करीत होता.

286
Women's Hostel Crime : महिला वसतिगृहातल्या सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या; आरोपीची रेल्वेखाली आत्महत्या

दक्षिण मुंबईतील चर्नी रोड येथे असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात (Women’s Hostel Crime) मंगळवारी (६ जून) रात्री अकोला जिल्ह्यातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. या विद्यार्थीनीचा मृतदेह तिच्या खोलीत विवस्त्र अवस्थेत आढळून आला. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी वसतीगृहाचा सुरक्षा रक्षक असून त्याचे नाव ओमप्रकाश कनोजिया असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच ओमप्रकाश याने चर्नी रोड स्थानकाजवळ ट्रेनखाली आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ओमप्रकाश यानेच तिच्यावर अतिप्रसंग करून तीची हत्या (Women’s Hostel Crime) केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रकाश कनोजिया (Women’s Hostel Crime) हा सुरक्षा रक्षक आणि लाँड्री मॅन म्हणून वसतिगृहात काम करीत होता. वसतिगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कनोजिया (३५) हा मुख्य गेटच्या सुरक्षा केबिनजवळ कपड्यांचे गाठोडे टाकून पहाटे ४.५५ वाजता वस्तीगुहाबाहेर पडताना दिसून आल्या मुळे ही हत्या मंगळवारी पहाटेच्या वेळी झाल्याचा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला आहे. विद्यार्थिनी ही वसतिगृहातून बाहेर न पडल्यामुळे वसतिगृहातील कर्मचारी तिच्या मोबाईलवर तीला संपर्क करीत होते, परंतु तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद येत नसल्यामुळे मंगळवारी सायंकाळी वसतिगृहाचे अधिकारी आणि कर्मचारी तीचा शोध घेत, चौथ्या मजल्यावरील खोलीत गेले. मात्र तिच्या खोलीला बाहेरून कुलूप असल्याचे बघून त्यांना संशय आला व त्यांनी खिडकीतून खोलीत डोकावले असता १८वर्षीय विद्यार्थिनी दोन बेडच्या मधोमध विवस्त्र अवस्थेत पडलेली आढळून आली.

(हेही वाचा – 72 hoorain : दहशतवाद्यांचा पर्दाफाश करणा-या ’72 हुरें’चा रिलिजच्या आधीच बोलबाला; कमाईच्या बाबतीत ‘दंगल’लाही टाकले मागे!)

वसतिगृह अधिकारी यांनी याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी (Women’s Hostel Crime) बनावट चावीने कुलूप उघडून आता प्रवेश केला असता विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचे समजले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर प्राथमिक तपास आणि वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ही विद्यर्थिनी (Women’s Hostel Crime) अकोला जिल्ह्यात राहणारी असून कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. तीचे वडील स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून नोकरील असल्याचे कळते. बळीत विद्यार्थिनी ही मुंबईतील एका कॉलेजात पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षात शिकत होती. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री साडे अकरा वाजता वसतिगृहातील एक मैत्रिण तिच्याशी शेवटची बोलली. वसतिगृहातल्या चौथ्या मजल्यावरील खोलीत एकटी असल्याने तिने बळीत विद्यार्थिनीला तिच्या खोलीत येण्यास सांगितले, मात्र बळीत तरुणीने तिच्या खोलीत राहणे नापसंत केल्याचे मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

याप्रकरणी मरीन ड्राईव्ह (Women’s Hostel Crime) पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी सांगितले.
वसतिगृहात फक्त ४० ते ५० मुली आहेत प्रत्येक मजल्यावर विद्यार्थिनींसाठी पाच मजली वसतिगृहात ३० खोल्या आहेत, वसतिगृहात तीन सुरक्षा रक्षक आहेत, ज्यात उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील कनोजिया यांचा समावेश होता,तो लॉन्ड्रीचे काम देखील करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या तळमजल्यावर (Women’s Hostel Crime) असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये कनोजिया हा मुख्य गेटवरील सुरक्षा केबिनजवळ कपडे धुण्याचे कपड्यांचे गाठोडे टाकून मंगळवारी पहाटे ४:५५ वाजता गेटच्या बाहेर पडतांना दिसून आला, त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि कनोजिया रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असल्याचे आढळले. पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

हेही पहा – 

वसतिगृहाच्या आवारात सोडून गेलेला कनोजियाचा (Women’s Hostel Crime) मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कनोजियाचे वडील, हे पूर्वी वसतिगृहात काम करायचे, ते आता कुलाब्यात काम करतात. प्रकाशचा धाकटा भाऊही वसतिगृहात कामाला होता, पण तो महिनाभराच्या रजेवर आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रात्री उशिरा वसतिगृहाला भेट दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.