Thackeray-Shinde group : …आणि ठाकरे-शिंदे गटातील नेतेमंडळींत झाले एकमत

शिवसेना सोडल्यानंतर 'सामना'च्या कार्यालयासमोर नारायण राणे यांनी त्यावेळी घेतलेली सभा उधळून लावल्याप्रकरणी शिवसेनेसह मनसेच्या ३८ जणांवर विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी (६ जून) आरोपनिश्चित केले.

164
Thackeray-Shinde group : ...आणि ठाकरे-शिंदे गटातील नेतेमंडळींत झाले एकमत

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक (Thackeray-Shinde group) म्हणून दररोज भिडणाऱ्या ठाकरे आणि शिंदे गटातील नेतेमंडळींत मंगळवारी एकमत झाल्याचे पहायला मिळाले. तेही न्यायदेवतेच्या दरबारात. निमित्त होते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संदर्भातील एका खटल्याचे.

शिवसेना सोडल्यानंतर ‘सामना’च्या कार्यालयासमोर नारायण राणे यांनी त्यावेळी घेतलेली सभा उधळून लावल्याप्रकरणी शिवसेनेसह मनसेच्या ३८ जणांवर विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी (६ जून) आरोपनिश्चित केले. या ३८ जणांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या तीन खासदार तसेच चार आमदारांचा समावेश आहे. या सुनावणीवेळी काही जण हेवेदावे विसरून एकमेकांशी गप्पा मारताना दिसले, तर काहींनी एकमेकांकडे पाहणेही टाळले.

(हेही वाचा – Shivsena : पगारवाढ दिली नाही म्हणून ‘शिवसेना भवना’तील कर्मचाऱ्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; शिंदेंना समर्थन)

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आरोपींना त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवले. तसेच त्यांना ते मान्य आहेत की नाहीत, अशी विचारणा केली. त्यावेळी सगळ्यांनी एकसुरात आरोप अमान्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावेळी निदान याबाबत तरी तुमच्यात एकमत आहे, अशी मिष्किल टिप्पणी न्यायाधीश रोकडे यांनी केली. त्यावेळी न्यायालयात एकच हशा पिकला.

अनिल परब आणि यशवंत जाधव यांच्यात चर्चा

– आरोपनिश्चतीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकत्र आले. श्रद्धा जाधव यांना रुग्णालयातून येण्यास उशीर झाल्याने दीड तासांच्या विलंबाने सुनावणी सुरू झाली. त्याआधी अनिल परब आणि यशवंत जाधव सतत काहीतरी चर्चा करत होते.
– किरण पावसकर आणि विशाखा राऊत यांच्यातही गप्पा रंगल्या होत्या. किरण पावसकर यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ यांच्या पाया पडले. परब आणि पावसकर यांनी मात्र सुनावणी संपेपर्यंत एकमेकांकडे पाहणेही टाळले.

हेही पहा – 

आरोप निश्चित झालेले खासदार, आमदार

• ठाकरे गट : खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार अनिल परब, अजय चौधरी, रवींद्र वायकर, माजी आमदार दगडू सकपाळ, माजी महापौर विशाखा राऊत (ठाकरे गट)

• शिवसेना : आमदार सदा सरवणकर, किरण पावसकर, यशवंत जाधव

• मनसे : बाळा नांदगावकर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.