जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. राजकीय पक्ष अतिशय सक्रिय होताना दिसून येत आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात आघाडीवर असून लवकरच पक्ष पातळीवर मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपचे सर्वोच्च नेतृत्व चांगलेच सक्रिय झाले आहे. संघटना आणि सरकारमधील फेरबदलाला अंतिम स्वरूप दिले जात आहे. सोमवारी रात्री उशिरा आणि मंगळवारी दिवसभर भाजप मुख्यालयात बैठका झाल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जाऊ शकते. त्याचबरोबर राजस्थान, छत्तीसगड मध्ये देखील मोठे बदल पाहायला मिळतील. तसेच, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जाऊ शकते. त्याचबरोबर राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही नेत्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्री केले जाऊ शकते.
(हेही वाचा Aurangzeb : अचानक ‘औरंग्या’च्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीसांचा सवाल)
सोमवारी संध्याकाळपासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष यांनी फेरबदलाबाबत बैठक घेतली. मंगळवारीही ही बैठक सुरूच होती. सूत्रांचे म्हणणे आहे की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन नवीन सरचिटणीस केले जाऊ शकतात. छत्तीसगडमध्ये सरकारविरोधातील आंदोलनाला गती देण्यासाठी आणि संघटनेला पुन्हा बळ देण्यासाठी एक-दोन नेत्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याची योजना आखली जात आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की, या बैठकीनंतर पक्ष आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, पंजाब, तामिळनाडू आणि केरळमधील इतर पक्षांसोबत युती करण्याबाबत निर्णय घेईल.या राज्यांमधून एनडीएची ताकद वाढवण्याचा पक्ष विचार करत असल्याचे मानले जात आहे.
Join Our WhatsApp Community