कोल्हापुरातल्या हिंसाचाराप्रकरणी छत्रपती संभाजी महाराजांचे परखड ट्वीट; म्हणाले….

239
कोल्हापुरातल्या हिंसाचाराप्रकरणी छत्रपती संभाजी महाराजांचे परखड ट्वीट; म्हणाले....
कोल्हापुरातल्या हिंसाचाराप्रकरणी छत्रपती संभाजी महाराजांचे परखड ट्वीट; म्हणाले....

औरंगजेबाचे फोटो स्टेट्सवर लावल्याप्रकरणी कोल्हापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला होता. या हिंसाचारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मरणासन्न अवस्थेपर्यंत त्यांची छळवणूक करणाऱ्या औरंगजेबाचे उद्दात्तीकरण झाल्याने कोल्हापुरातील जनतेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी छत्रपती घराण्याचे वंशज राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी ट्वीटद्वारे आवाज उठवला आहे.

“शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे”, असे संभाजीराजे छत्रपती  म्हणाले आहेत.

(हेही वाचा – कोल्हापूरातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस सतर्क; सोशल मीडियावर अधिक लक्ष)

कोल्हापुरात नेमके काय घडले?

कोल्हापूर जिल्ह्यातील काही विशिष्ट समाजकंटक तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचा फोटो स्टेटसवर ठेवला होता. या प्रकरणामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमा होऊन तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी करू लागले. दरम्यान त्याचवेळी एका गटाने एका विशिष्ट समाजाच्या वस्तीवर दगटफेक केली. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले. याच पार्श्वभुमीवर बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली त्याच दरम्यान मोठा जमाव जमा झाला. या प्रकरणामुळे काही वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेकीचे प्रयत्न करण्यात आले. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज तर अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.