छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात कोल्हापूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगजेबाचा पुतळा जाळल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशपांडे यांच्याशिवाय आणखी आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ आणि ३७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Kolhapur Bandh : तणावपूर्ण शांतता; मात्र इंटरनेट सेवा बंदच)
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक तक्रार नोंदवली गेली आहे. कोल्हापूरमध्ये बुधवारी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे फोटो सोशल मीडिया स्टेटसला ठेवत महापुरुषाचा अपमान आणि उद्दात्तीकरण केल्याप्रकरणाने वातावरण चांगलेच तापले होते. अनेक ठिकाणी या घटनेचे गंभीर पडसाद पाहायला मिळाले. पीटीआयने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, निषेधाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात गुरुवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. १९ जूनपर्यंत निषेधाचे आदेश जारी करून एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त जमाव एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत म्हणाले, “काही संघटनांनी कोल्हापूर बंद करण्याचे आव्हान दिले होते आणि त्यांचे काही कार्यकर्ते बुधवारी शिवाजी चौक परिसरात जमा झाले. त्यांची निदर्शने संपल्यानंतर काही हल्लेखोरांनी दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांना या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community