Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदित्य ठाकरेंना अमान्य?

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ६ जून रोजी आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट केले होते.

241

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्यापासून ठाकरे गटाने ‘हिंदुत्वा’चा अजेंडा बाजूला ठेवल्यानंतर आता छत्रपती शिवरायांचा इतिहासही सोयीनुसार वापरायला सुरुवात केली आहे. शिवराज्याभिषेक दिनाला आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्वीटवरून हे स्पष्ट होत असून, त्यांना महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ मान्य नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ६ जून रोजी आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, पण इतिहासाची मोडतोड करून. ‘हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा’, अशी ओळ आदित्य यांनी महाराजांच्या तोंडी घातली आहे. वास्तविक, ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रीं ची इच्छा’, हे महारांजांच्या मुखातून निघालेले उद्गार. ऐतिहासिक दस्तावेजांतही त्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

(हेही वाचा BJP Mission 48 : भाजपचे लोकसभेसाठी ‘मिशन ४८’; ‘या’ नेत्यांना दिली मतदारसंघांची जबाबदारी)

परंतु, ठाकरे गटाची हिंदुत्वासंदर्भात बदललेली भूमिका रेटण्यासाठी आदित्य यांनी इतिहासाची मोडतोड केली. हिंदवी स्वराज्य हे शब्द जाणिवपूर्वक वगळून ‘हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा’ इतकी सोयीची ओळ ट्वीट केली. त्यामुळे समाज माध्यमांवर आदित्य यांना प्रचंड ट्रोल केले जात असून, उद्धवसेनेच्या महाराजांविषयीच्या सोयिस्कर भूमिकेविषयी नेटकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.