हेल्पलाईनवरील केवळ ७० टक्केच कचऱ्याच्या तक्रारी सोडवता आल्या महापालिकेला

212
हेल्पलाईनवरील केवळ ७० टक्केच कचऱ्याच्या तक्रारी सोडवता आल्या महापालिकेला
हेल्पलाईनवरील केवळ ७० टक्केच कचऱ्याच्या तक्रारी सोडवता आल्या महापालिकेला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील कचऱ्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बुधवारी ७ जूनपासून सुरू झालेल्या हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊसच पडला. गुरुवार ८ जून रात्री उशिरापर्यंत एकूण ३१९ कचऱ्या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या. परंतु त्यातील ५७ तक्रारी या कचरा आणि डेब्रिजशी संबंधित नसल्याने उर्वरित २५७ तक्रारीपैंकी १७९ तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्याच्या दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. २५७ तक्रारींपैंकी १७९ तक्रारी सोडवण्यात आल्याने महापालिकेला दिवसभरात केवळ ७० टक्केच तक्रारी निकालात काढून जनतेचे समाधान करता आले असे स्पष्ट होत आहे.

नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी बुधवारी, ७ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अ‍ॅप हेल्पलाईन’ची सुविधा 8169681697 या क्रमांकावर देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या हेल्पलाईनवर एकूण ३१९ तक्रारी नोंदविल्या. परंतु त्यातील ५७ तक्रारी या कचरा आणि डेब्रिजशी संबंधित नाहीत. उर्वरित २५७ तक्रारीपैंकी १७९ तक्रारी महानगरपालिकेने तात्काळ सोडविल्या आहेत. तसेच ७८ ठिकाणच्या तक्रारींवरही महानगरपालिकेचे पथक काम करीत आहे. या ७८ ठिकाणी कचरा जास्त असल्याने या तक्रारीही लवकरात लवकर सोडविल्या जातील, असे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी सांगितले.

(हेही वाचा – BMC : खासगी प्राथमिक शिक्षकांसाठी खुशखबर; जून किंवा जुलैपासून होणार पगारवाढ)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही हेल्पलाईनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला जात आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. ही यंत्रणा मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. महानगरपालिककडून मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे की, या हेल्पलाईनवर केवळ कचरा आणि डेब्रिजच्याच तक्रारींची नोंद घेतली जात आहे आणि त्याच तक्रारी सोडविण्यात येत आहेत. नागरिकांनी खासगी मालमत्ताशी संबंधित तक्रारी करू नयेत.

तक्रार करण्याआधी ही काळजी घ्या!

हेल्पलाईनवर तक्रार करण्याआधी मुंबईकरांनी काही बाबींकडे दुर्लक्ष केल्याने तक्रारींचा आकडा वाढला आहे. वास्तविक या हेल्पलाईनवर तक्रार करताना किंवा कचऱ्याचे वा डेब्रिजचे छायाचित्रे काढताना मोबाईलचे लोकेशन सुरू असणे गरजेचे आहे. काही नागरिकांनी छायाचित्र काढताना लोकेशन बंद ठेवले होते आणि घरी अथवा अन्य ठिकाणी गेल्यावर लोकेशन ऑन करून त्या कचऱ्याचा फोटो हेल्पलाईनवर अपलोड केला. त्यामुळे त्या तक्रारींचा तपशील कळू शकत नव्हता असे महापालिकेने म्हटले आहे.

कचऱ्यांच्या तक्रारींकडे ७०० डोळ्यांची नजर, ३५० कनिष्ठ अवेक्षक कार्यरत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार बुधवार, ७ जूनपासून 8169681697 या व्हाटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अ‍ॅप हेल्पलाईन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येत आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिज बाबत तक्रार नोंदविल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जात आहे. या प्रणालीसाठी महापालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओरशिअर) यांची नेमणूक केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.