राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ‘तुमचाही दाभोलकर होणार’ अशी पोस्ट ‘राजकारण महाराष्ट्राचं’ या नावाच्या ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल करत या धमकीची सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान याप्रकरणावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया देत संबंधित आरोपीवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट)
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवरती मतभेद असले तरी मनभेद नाही. कोणत्याही नेत्याला धमक्या देणं किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडण हे खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल घेत कडक कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community