BJP Meeting : भाजप मुख्यमंत्र्यांची 11 जूनला दिल्लीत बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार ‘गुरुमंत्र’

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे, भाजपमध्ये बैठकांमागून बैठका बोलाविल्या जात आहेत.

252
BJP Meeting : भाजप मुख्यमंत्र्यांची 11 जूनला दिल्लीत बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार 'गुरूमंत्र'

वदंना बर्वे

लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे धोरण ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये (BJP Meeting) मॅराथॉन बैठकांचे अखंडित सत्र सुरू आहे. याच मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 11 जून रोजी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे.

भारतीय जनता पक्ष (BJP Meeting) आता निवडणुकीच्या मूडमध्ये आला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे, भाजपमध्ये बैठकांमागून बैठका बोलाविल्या जात आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 11 जून रोजी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलाविली आहे. यात लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा – शरद पवारांना आलेल्या धमकीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…)

महत्वाचं म्हणजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना खास करून बोलाविण्यात आले आहे. यामुळे मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीवर विशेष चर्चा होणार आहे. भाजपशासित (BJP Meeting) या राज्यात नोव्हेंबरपूर्वी विधानसभेची निवडणूक होणे आहे.

आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि त्या योजनांचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहचत आहे की नाही? याचा आढावा घेण्यासोबतच या योजनांचा प्रचार आणि प्रसार जोमात करण्याची भाजपची (BJP Meeting) योजना आहे.

भाजपने (BJP Meeting) निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्यांमध्ये सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाची माहिती देवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय – काय केले जावू शकते? यावर चर्चा केली जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.