राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू सुनील राऊतांना शुक्रवारी सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. लागोपाठ दोन बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली असून या प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी नितेश राणेंनी राऊतांना आलेल्या धमकीवरून जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे काय म्हणाले…
शरद पवार हे आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या आणि आमच्या भूमिका असो, किंवा त्यांचे काही विचार जे आम्हाला पटत नसेल तरी आमच्या राज्यामध्ये कोणालाही त्रास होणार नाही एवढी काळजी आमचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. शेवटी हे उद्धव ठाकरेंचे सरकार नाही, महाविकास आघाडीचे सरकार नाही. आदरणीय शरद पवारांच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी आमचे सरकार घेईल असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.
(हेही वाचा – शरद पवारांना आलेल्या धमकीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…)
पुढे संजय राऊतांना आलेल्या धमकीबद्दल नितेश राणे म्हणाले, ‘मच्छर मारण्यासाठी कोणालाही धमकी देण्याची गरज नाही, पाय हलवला तरी मच्छर मरतो. संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांना नेमकी धमकी कोणी दिली ते विचारा, कारण मी असे ऐकले आहे की, मुंबईच्या एक डॉक्टर महिलादेखील संजय राऊतांच्या जीवावर उठली आहे. कदाचित त्या महिलेकडून धमकी आली आहे का हे जरा सुनिल राऊत आणि संजय राऊतांनी सांगावे. संजय राऊत त्या डॉक्टर महिलेला ऊठसुठ धमकी द्यायचे, शिव्या द्यायचे तर त्या डॉक्टर महिलेकडून धमकी आली आहे का याचे उत्तर संजय राऊतांनी दयावे.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community