मुंबई उपनगरातील बोरीवलीतील गोराई गाव आणि मार्वे मनोरी बेटावर मलनि:सारण वाहिन्यांची सेवा नसल्याने यासर्व भागांमध्ये आता या सेवांचे जाळे पसरवले जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही बेटांवर स्वतंत्र मलनि:सारण केंद्र उभारुन मलवाहिनींची सेवा टाकण्यासाठी आराखडा तयार करून त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
केंद्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या इतर संबंधित खात्यांनी निर्माण होणार सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जाईल याची खात्री करावी अन्यथा याची नुकसान भरपाई राज्य शासनाने १ एप्रिल २०२० पासून वसूल करावी अशी सूचना केली आहे. त्यानुसार गोराई व मनोरी बेटावर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनि:सारण वाहिन्या टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे आदी कामांची तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
(हेही वाचा – दहिसर जकात नाक्याच्या जागेवर उभारणार अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त सार्वजनिक प्रसाधनगृह)
त्यानुसार बोरीवलीतील गोराई आणि मालाड येथील मनोरी बेटावर मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे व मलनि:सारण केंद्राचा आराखडा तयार करून त्याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डिपीआर) बनवण्यासाठी टंडन अर्बन सोल्यूशन्स प्रायव्हेट या कंपनीची नियुक्ती केली जात आहे. हा डीपीआर बनवण्यासाठी विविध करांसह १ कोटी ०४ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community