Amit Shah : अमरनाथ यात्रेकरूंचे दर्शन सुलभपणे व्हावे हीच सरकारची प्राथमिकता – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता, त्यांची पुनर्भरण व्यवस्था सुनिश्चित करणे, सोबतच ऑक्सिजन सिलेंडरचा पर्याप्त साठा ठेवणे आणि डॉक्टरांची अतिरिक्त पथके उपलब्ध करून देण्याचे निर्देश अमित शहा (Amit Shah) यांनी दिले.

226
Amit Shah : अमरनाथ यात्रेकरूंचे दर्शन सुलभपणे व्हावे हीच सरकारची प्राथमिकता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

अमरनाथ यात्रेकरूंना सुलभतेने दर्शन घेता यावे, त्यांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागू नये, याला मोदी सरकार प्राधान्य देत असल्याचे (Amit Shah) केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सांगितले. नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात ते बोलत होते. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव, गुप्तवार्ता विभागाचे संचालक, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक, सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव, लष्कर, केंद्र सरकार आणि जम्मू व काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्याचे निर्देश (Amit Shah) अमित शाह यांनी दिले. विमानतळ आणि रेल्वे स्थानकापासून यात्रेच्या बेस कॅम्पपर्यंतच्या मार्गावर प्रत्येक प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर गृहमंत्र्यांनी भर दिला. यात्रेकरूंच्या सुविधेसाठी श्रीनगर आणि जम्मूमधील विमानसेवा रात्रीच्या वेळी देखील उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली.

(हेही वाचा – Amarnath yatra : यंदा अमरनाथ यात्रेला जाणार असाल, तर प्रतिबंध घातलेल्या अन्नपदार्थांची यादी वाचाच)

ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता, त्यांची पुनर्भरण व्यवस्था सुनिश्चित करणे, सोबतच ऑक्सिजन सिलेंडरचा पर्याप्त साठा ठेवणे आणि डॉक्टरांची अतिरिक्त पथके उपलब्ध करून देण्याचे निर्देश अमित शहा (Amit Shah) यांनी दिले. पुरेशा प्रमाणात उपचार खाटा तसेच कोणत्याही वैद्यकीय आपत्तीचा सामना करण्यासाठी रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सोबतच, अमरनाथ यात्रेकरूंची ये-जा, निवास, वीज, पाणी, प्रवास आणि आरोग्य यांच्यासह सर्व आवश्यक सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली. यात्रा मार्गावर उत्तम संपर्क सुविधा आणि भूस्खलन झाल्यास तातडीने मार्ग खुले करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे तैनात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

श्री अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना आरएफआयडी कार्ड देण्यात येणार असून या कार्डमुळे यात्रेकरूंचे रियल टाईम लोकेशन शोधता येऊ शकते, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. प्रत्येक अमरनाथ यात्रेकरूचा पाच लाख रुपयांचा तर यात्रा मार्गावरील प्रत्येक पशुचा 50 हजार रुपयांचा विमा उतरवण्यात येणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. याव्यतिरिक्त, यात्रेसाठी तंबू शहर, यात्रा मार्गावर वाय फाय, हॉटस्पॉट आणि प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच बाबा बर्फानी यांचे ऑनलाइन थेट दर्शन, पवित्र अमरनाथ गुंफेमध्ये सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरतीचे थेट प्रसारण केले जाणार आहे. तसेच बेस कॅम्पवर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. (Amit Shah)

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.