पेरणीच्या हंगामात कित्येकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. याच पार्श्वभूमीवर बियाणांच्या बाबतीत होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून बोगस बियाणे विक्रेत्यांवर चांगलाच चाप बसणार आहे. हा कायदा येत्या अधिवेशनात पारित करण्यात येईल अशी घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी केली आहे. अकोल्यात एका वृत्तसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमास्थळी बोलत असताना सत्तारांनी ही मोठी घोषणा केली आहे.
(हेही वाचा – सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हृदयात….)
यावेळी बोलत असताना अब्दुल सत्तार म्हणाले की, ज्या विक्रेत्यांकडे बोगस बियाणे, बोगस औषधे आणि बोगस खते असतील तर तात्काळ नष्ट करावीत. असे न केल्यास मी पूर्ण अहवाल राज्यपालांकडे देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यास त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाईल असे सत्तार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव राज्यपालांकडे घेऊन जाणार आहोत. पोलीस, महसूल आणि कृषी या तीन विभागांचे दोन महिन्यांसाठी विशेष पथक तयार करण्यात यावे, असे केल्याने बोगस व्यवहार करणारे समोर येतील. मी किती दिवस कृषीमंत्री राहिल हे माहित नाही, पण मंत्री असून आपण शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाहीतर शेतकरी पोशिंदा आपल्याला माफ करणार नाही असेही सत्तार म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community