राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे या नावांची वर्णी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नाहीय. दरम्यान कार्यकारी अध्यक्षपदाच्या नावांची घोषणा होताच अजित पवारांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देणेही टाळले. तसेच अजित पवार वर्धापनदिनाच्या कार्यक्रम संपताच निघून गेल्यानंतर, ते कुठे गेले अशा चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
(हेही वाचा – सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हृदयात….)
वंदना चव्हाणांचा नेमका गौप्यस्फोट काय?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचा आनंद आहे. प्रफुल्ल पटेल हे वरिष्ठ नेते होतेच. राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे तो पुन्हा आणायच्या दृष्टीने हा चांगला निर्णय आहे. पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळे किंवा अजित पवारांकडे असेल या गोष्टीचा आम्ही विचारसुध्दा करीत नाही. जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिलेला तेव्हा त्यांनी मागे घेतला नाही किंवा ऐकलेच नाही, तेव्हा अजित पवारांनीच सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवावे असा प्रस्ताव शरद पवारांसमोर ठेवला होता,’ असा गौप्यस्फोट वंदना चव्हाणांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community