Ramesh Bais : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक विकासामध्ये उच्चतम योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विदर्भातील अकृषी व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक संपन्न झाली.

179
Ramesh Bais : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक विकासामध्ये उच्चतम योगदान द्यावे - राज्यपाल रमेश बैस

विद्यार्थ्यांना उच्चतम ज्ञान व कौशल्य मिळावे, त्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांनी (Ramesh Bais)शैक्षणिक विकासामध्ये उच्चतम योगदान द्यावे, यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रमुख म्हणून गतिशील प्रयत्न करावेत अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस (Ramesh Bais) यांनी दिल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विदर्भातील अकृषी व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक संपन्न झाली. बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते.

बैठकीला महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्रीअब्दुल सत्तार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, राज्यपालांचे (Ramesh Bais) प्रधान सचिव डॉ. संतोष कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तथा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा, याशिवाय अकृषी व कृषी विद्यापीठातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा – Odisha Train Accident : सीबीआयकडून बहनगा रेल्वे स्थानक सील)

बैठकीमध्ये विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेवर लावणे, सीएसआर फंड मधून जास्तीत जास्त निधी मिळविणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची येत्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी करणे, सर्व परीक्षांच्या पदवी व गुणपत्रिका नॅड पोर्टलवर अपलोड करणे, उद्योग व संस्थांमध्ये समन्वय, नॅकचे मानांकन, भारतीय ज्ञान पद्धतीचे एकीकरण, स्वयम अभ्यासक्रम लागू करणे, सर्व विद्यार्थ्यांना इंटरशिपची सुविधा उपलब्ध करून देणे, सर्व विद्यापीठ व महाविद्यालयात संशोधन व विकास कक्षाची स्थापना करणे, इ-समर्थची काटेकोरपणे अंमलबजावणी आदी बाबींवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Ramesh Bais)

विद्यार्थी महत्त्वाचा आहे, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी विद्यापीठांनी कार्य करावयाचे आहे. विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, संशोधनासाठी, विदेशात जाण्यासाठी त्यांच्या परीक्षांचे निकाल 30 दिवसाच्या आत विद्यापीठांनी काटेकोरपणे लावावेत. एन. आय. आर. एफ
रँकिंग मध्ये मुंबई व पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठांचा पहिला शंभर मध्ये क्रमांक नाही, याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे, इतर राज्यांनी या राज्याचा आदर्श घ्यावा, यासाठी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवण्याकरिता गतिशील प्रयत्न करावेत. (Ramesh Bais)

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक क्षेत्रापासून स्वायत्त महाविद्यालये व विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमध्ये लागू होणार असून इतर सर्व अभ्यासक्रमाकरिता त्याची तयारी येत्या सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश सुद्धा कुलपती (Ramesh Bais) महोदयांनी बैठकीत दिले.

सर्व विद्यापीठांमध्ये एक समान शैक्षणिक नियमिका असावी, याकरिता प्रयत्न व्हावेत. उच्चशिक्षण आणि कृषी विकासासाठी रोड मॅप तयार करण्यात यावा. समाज परिवर्तनाचे अग्रदूत विद्यापीठ आहे. विद्यापीठाची नाळ ग्रामीण भागाशी जोडली असून प्रत्येक विद्यापीठाने दहा गावे दत्तक घ्यावीत. याशिवाय आपल्या परिसरातील महाविद्यालयांनी सुद्धा दत्तक गावे घ्यावीत असे प्रयत्न विद्यापीठाने करावेत. या संदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मॉडेल व्हिलेज संकल्पनेला भविष्यातील वाव सिद्ध झाला. (Ramesh Bais)

तत्पूर्वी महामयम राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) तथा सन्माननीय कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा संशोधित विविध पिकवान यंत्रे अवजारे व विविध तंत्रज्ञानाचे प्रदर्शनीच्या माध्यमातून अवलोकन करीत विद्यापीठाच्या शिक्षण संशोधन तथा विस्तार कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.