Staff Reduction : ‘या’ कंपनीमध्ये होणार मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात

याआधी गूगल, अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, मिशो यासाख्या इतर कंपन्यांनी देखील नोकरकपात केली आहे.

198
Staff Reduction : 'या' कंपनीमध्ये होणार मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात

आर्थिक मंदी, वाढणारा खर्च, घटणारी मागणी अशी करणं देत अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून (Staff Reduction) टाकलं आहे. विशेषतः टेक कंपन्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. अशातच पुन्हा एकदा एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचे ठरवले आहे. याआधी गूगल, अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, मिशो यासाख्या इतर कंपन्यांनी देखील नोकरकपात केली आहे.

शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या बायजू या कंपनीने आता नोकरकपातीचा (Staff Reduction) निर्णय घेतला आहे. बायजू हे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित एडटेक स्टार्टअप (Edtech’s BYJU’S) आहे. यापूर्वी देखील कंपनीनं अनेकांना घरी पाठवलं होतं.

(हेही वाचाआषाढी एकादशी वारी २०२३ : वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या)

तोटा कमी करण्याचं कारण

कंपनीचा होणार तोटा कमी करण्यासाठी बायजू जवळपास १००० कर्मचाऱ्यांना (Staff Reduction) कामावरून कमी करणार असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. बायजूच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमला कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचा दावा मॉर्निंग कॉन्टेक्स्टनं केला आहे.

कर्जदात्यांविरुद्ध खटला

कंपनीनं नोव्हेंबर २०२१ मध्ये यूएसमध्ये उभारलेल्या १.२ बिलियन अमेरिकन डॉलरच्या टर्म लोन बीच्या कर्जदात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत आणखी कोणतंही व्याज देणार नसल्याचंदेखील कंपनीनं म्हटलं आहे.

आधीही केली होती कर्मचारी कपात

बायजू या कंपनीमध्ये नोकरकपातीची (Staff Reduction) ही दुसरी वेळ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीनं जवळपास 1,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. खर्च आणि ऑपरेशन्सचं कारण त्यावेळी कंपनीनं दिलं होतं. बायजूच्या या निर्णयाचा फटका अनेक विभागांना बसल्याचंदेखील सांगितलं जात होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.