महाराष्ट्रात अखेर मान्सूनचे आगमन झाले. दक्षिण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे.
(हेही वाचा wtc final 2023 ind vs aus india : भारताला ‘अजिंक्य’ होणे शक्य! ‘विराट’ खेळीची आवश्यकता; इतिहास आहे साक्षी)
महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सून कधी दाखल होणार याकडे डोळे लावून बसले होते. अखेर राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला.
बिपरजॉयमुळे उशीर
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. अखेर मान्सून केरळमध्ये ८ जूनला म्हणजेच सात दिवस उशिरा दाखल झाला. केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होतो. त्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत दाखल होतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचे आगमन उशिराने झाले.
Join Our WhatsApp Community