धारावी येथे रविवारी, रात्री ८ वाजताच्या सुमारास शमा बिल्डिंगला आग लागली. ७या मळ्यांच्या या इमारतीला आग लागल्यावर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनाही तातडीने घटनास्थळी धाव घेतली, त्यामधून सुमारे ३२ जण किरकोळ जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ही आग लेव्हल १ ची होती. इमारतीला आग लागताच ती सात मजल्यांच्या इमारतीपर्यंत पोहचली होती. इलेक्ट्रिक वायरिंग,सीसीटीव्ही आणि इलेक्ट्रिक डक्टिंग यांनाही आग लागली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने येथील विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर ०१ बीए सेट वापरून चार मोटर पंपांच्या ०२ छोट्या होज लाइनचा वापर करून ही आग विझवली. या आगीमध्ये 32 जण किरकोळ जखमी झाले. त्यापैकी 29 जणांना महापालिकेच्या सायन रुग्णालयात आणि ३ जणांना आयुष रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
(हेही वाचा 72 hooren : स्टुडिओमध्ये ‘टीव्ही शो’च्या दरम्यान धर्मांध शोएब जमईची महिलेने केली धुलाई)
Join Our WhatsApp Community