महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अभियांत्रिकी, कृषी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षा प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे. पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. जन्मतारीख व अर्ज क्रमांक टाकून विद्यार्थ्यांना आपापला निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या cetcell.mahacet.org किंवा mahacet.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या. गरजेनुसार पीसीएम किंवा पीसीबी लिंकवर क्लिक करून तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख भरा. डाउनलोड बटणावर क्लिक करून गुण तपासता येतील. यंदा एमएचटी सीईटीची समुपदेशन प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी प्रथमच मोबाइल अॅपचा वापर केला जाणार आहे. उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांची माहिती, आवश्यक सूचना व जागांची माहिती मिळेल. हे ऍप विद्यार्थी व पालकांना दोघांनाही वापरता येणार आहे.
(हेही वाचा – न्यू जर्सीत मराठी शेफने बनवली ‘मोदीजी थाळी’; भारताच्या विविध प्रांतातील विशेष व्यंजनांचा समावेश)
पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) ग्रुपसाठी ९ ते १५ मे दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती, तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायो) ग्रुपसाठी १५ ते २० मे या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. यंदा एमएचटी सीईटीच्या परीक्षेसाठी ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
असा पहा एमएचटी सीईटी २०२३ निकाल?
१. निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
२. cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर पोर्टल लिंक्स यावर क्लिक करा.
३. त्यानंतर एमएचटी सीईटी निकाल २०२३ या लिंकवर क्लिक करा.
४. रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा.
५. रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community