कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येताच काँग्रेसने मागील भाजप सरकारने जे जे निर्णय घेतले ते रद्द करण्याचा तडाखा लावला आहे. ज्यामध्ये हिजाबवर बंदी, टिपू सुलतानची जयंतीवर बंदी असे निर्णय घेतले होते, आता हे सगळे निर्णय रद्द करण्याबरोबर पाठ्यक्रम पुस्तकात जे धडे भाजपने घातले होते, तेही काढून टाकण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडा वगळण्याची तयारी सरकारने केली आहे. काँग्रेसचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले की, आमचे सरकार मागील भाजप सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये आणलेले काही धडे काढून टाकण्याचा विचार करत आहे. अशा लोकांच्या कथा आपल्याकडे असायला हव्यात, ज्यांनी देशाच्या उभारणीत खरे योगदान दिले आहे. जेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा प्रश्न येतो, तेव्हा इतिहासाने अशा लोकांची नावे लक्षात ठेवली पाहिजेत, ज्यांनी त्यात प्रत्यक्ष भाग घेतला होता. भाजपने मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपले वैचारिक मुद्दे घालण्याचा प्रयत्न केला, जे योग्य नाही. काँग्रेसने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुधारात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मुध बंगारप्पा यांनी सांगितले की, शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक आहे तेच अभ्यासक्रमात ठेवले जाईल. अनावश्यक गोष्टी अभ्यासक्रमातून काढून टाकल्या जातील. कर्नाटकममधील विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार बीके हरिप्रसाद यांनी हेडगेवार यांना भ्याड आणि बनावट स्वातंत्र्यसैनिक म्हटले. यासोबतच त्यांनी शालेय अभ्याक्रमातून हेडगेवार यांचा आयुष्यावरील धडा वगळण्यावर भर दिला.
(हेही वाचा Sharad Pawar : कर्मकांडाला थोतांड म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांना नातू रोहित पवारांची चपराक)
Join Our WhatsApp Community