केंद्र सरकारने सर्व राज्यांना ५९,१४० कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून १,१८,२८० कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यात महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी ७४७२ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व राज्यांना जून २०२३ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे.
या राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला तो २१ हजार २१८ कोटी तर त्या खालोखाल बिहारला ११,८९७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वाटप केलेल्या रकमेचा राज्यनिहाय विभाजन तक्ता राज्यांना वाटप केलेली एकूण रक्कम – १ लाख १८ हजार २८० कोटी.
(हेही वाचा Muslim : हिजाबची सक्ती आणि धर्मांतर करणाऱ्या ‘या’ राज्यातील शाळांवर चालणार बुलडोझर )
Join Our WhatsApp Community