मागच्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune Fire) सतत कुठे ना कुठेतरी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातील मार्केटयार्डात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील ३ कामगार होरपळले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
पुण्यात मध्यराञी मंगळवार १३ जून रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या आसपास मार्केटयार्ड, गेट नंबर एक येथील रेवण सिद्धी हॉटेलला आग (Pune Fire) लागली. या घटनेत हॉटेलच्या पोटमाळ्यावर झोपलेल्या ३ कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरु आहे.
(हेही वाचा – Maharashtra : केंद्राने महाराष्ट्राला दिले ७,४७२ कोटी रुपये)
आगीची (Pune Fire) माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
अग्निशमन जवानांनकडू आगीवर नियंत्रण :
घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले की, सदर ठिकाणी दोन मजले असणाऱ्या इमारतीत हॉटेलमधे आग (Pune Fire) लागली होती. शटर आतमधून कुलूपाने बंद असून 3 कामगार पोटमाळ्यावर अडकल्याचे समजले असता जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून बी ए सेट परिधान करत आतमधे पोटमाळ्यावर प्रवेश केला व आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवत तिथे अडकलेल्या 3 कामगारांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत तत्परतेने बाहेर काढून शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ मधून ससून रुग्णालयात रवाना केले आणि पुढे कार्यवाही करत आग पुर्ण विझवली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली त्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे वातावरण तयार झाले.
या कामगिरीत अग्निशमन (Pune Fire) दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे तसेच तांडेल मनिष बोंबले, मंगेश मिळवणे व फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी सहभाग घेतला.
मुन्ना राठोड आणि संदीप अशी मृत (Pune Fire) कामगारांची नावे आहेत; तर शशिकांत गवळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community