मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील (Mumbai-Pune Expressway Accident) खंडाळा घाटात एका तेलाच्या टॅंकरला आग लागली. त्यामुळे मागील एका तासापासून या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. टँकरसोबतच पुलाखालील गाड्यांना देखील आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा हा टँकर तेलाचा असल्यामुळे आगीने भीषण स्वरूप धारण केले आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – Online Gaming : आता ‘या’ प्रकारचे ऑनलाईन गेम होणार बंद; केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची घोषणा)
सध्या घटनास्थळी (Mumbai-Pune Expressway Accident) बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे. एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर अपघातात चार जण दगावले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही (Mumbai-Pune Expressway Accident) मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community