ग्रामीण महाराष्ट्राचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार हाताळणाऱ्या कंत्राटी ग्रामसेवकांना शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra Cabinet decision) खुशखबर दिली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात तब्बल १० हजारांची वाढ करण्यास मंगळवारी १३ जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या ग्रामसेवकांना आता मिळणार १६ हजार रुपये मानधन मिळणार आहे.
त्याशिवाय सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये (Maharashtra Cabinet decision) घेण्यात आला. त्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
(हेही वाचा – Malegaon conversion : करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे; शहरात तणावाचे वातावरण)
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात (Maharashtra Cabinet decision) आला. त्याशिवाय लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा आणि पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य निर्णय
– अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ
– मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना
– स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली
– चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community