वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये (WTC Final 2023) भारताच्या पदरात मोठे अपयश पडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द तब्बल २०९ धावांनी भारताचा पराजय झाला. त्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून बरेच प्रश्न उपस्थित झाले आहे. अशातच भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यात कोण योग्य आहे विराट कोहली की रोहित शर्मा असा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता माजी बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी फलंदाज सौरव गांगुलीने उडी घेतली आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आपले कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहित शर्मा याच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली यांनी आपले मत मांडले आहे. “बीसीसीआयने विराटला कसोटीचे कर्णधारपद सोडण्यासाठी कोणताही दबाव टाकला नव्हता, कर्णधारपद सोडण्याचा हा कोहलीचा वैयक्तिक निर्णय होता.” (WTC Final 2023)
नेमकं काय म्हणाले गांगुली?
गांगुली पुढे म्हणाले, “आता यावर बोलुन काहीच फायदा नाही. कर्णधारपद सोडावे हा विराटचा निर्णय होता. त्यावेळी कर्णधारपदी कोणाचीतरी नेमणूक करणं गरजेचं होता. त्यावेळी रोहित शर्मा हा सर्वोत्तम पर्याय होता. माझा रोहितवर खूप विश्वास आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणे ही खूप मोठी गोष्ट आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा (WTC Final 2023) आयपीएल जिंकणे कठीण आहे. तुम्हाला १४ सामने खेळायचे आहेत, त्यानंतर आयपीएलमध्ये प्लेऑफ आहे. मला विश्वास आहे की कर्णधार म्हणून रोहित हा अजूनही सर्वोत्तम पर्याय आहे.”
कर्णधार धोनी याच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) जिंकली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community