Love Jihad : अनामिका झाली ‘फातिमा’; कुटुंबियांनी केले पिंडदान 

आम्ही विचार केला होता की, मुलीचे कन्यादान करू पण आता आमच्यावर पिंडदान करण्याची वेळ आली आहे, असे अनामिकाचा भाऊ म्हणाला.

492

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये अयाज नावाच्या मुसलमान तरुणाशी निकाह केल्यानंतर अनामिकाने धर्म बदलून तिचे नाव फातिमा ठेवण्यात आले. कुटुंबियांचा विरोध पत्करून अनामिकाने घेतलेल्या निणर्यामुळे तिचे कायमचे आपल्या घरच्यांशीस संबंध तुटले आहेत. कारण कटुंबीयांनी ‘ती आमच्यासाठी आता मेली आहे’, असे सांगत कुटुंबीयांनी चक्क तिचे नर्मदा नदीच्या काठावर ११ जून रोजी पिंडदान करण्यात आले. या अंत्ययात्रेचे कार्डही छापण्यात आले होते.

मुलीच्या कुटुंबियांनी फक्त तिचे पिंडदान केले नाही तर श्राद्धाचे जेवनही ठेवले होते. अयाजशी लग्न केल्यानंतर अनामिकाने अयाजशी लग्न केल्यानंतर फातिमा बनलेल्या अनामिकाच्या नातेवाईकांनी सांगितले की, आमच्या मुलीने आम्हाला समाजात कुठेच तोंड दाखवायला जागा सोडली नाही. दुसरीकडे मुलीचा भाऊ म्हणाला की, आम्ही विचार केला होता की, मुलीचे कन्यादान करू पण आता आमच्यावर पिंडदान करण्याची वेळ आली आहे. तरीही मुलीच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण घटनेवर जे काही होत ते चांगल्यासाठी होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या पिंडदानादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी संतांच्या सान्निध्यात रडत आपल्या व्यथा मांडल्या.

(हेही वाचा Twitter : ट्विटरच्या माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या चोराच्या उलट्या बोंबा; केंद्र सरकारने सुनावले )

या दोघांची लग्न पत्रिका आणि मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी निषेध नोंदवण्यास सुरुवात केली.  १ जून रोजी हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि हे प्रकरण षडयंत्र असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली. मुलीचे धर्मांतर झाल्याचा आरोप करत हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले. दरम्यान, संस्थेशी संबंधित काही लोकांनी मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.