कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी परिणामकारक!

दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

174

भारत सरकारच्या आदेशान्वये मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून ‘कोविड – १९’ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया’ या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली. तर दिनांक १५ मार्च, २०२१ पासून ‘भारत बायोटेक’ कंपनी निर्मित ‘कोव्हॅक्सीन’ ही लस वापरण्यासाठी भारत सरकारची मंजुरी प्राप्त झाली. या व्यतिरिक्त इतर काही वेगळ्या लसी देखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. सध्या या दोन्ही लस मुंबईसह देशात वापरण्यात येत असून, दोन्हीही लसी अत्यंत परिणामकारक आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लसीकरण केंद्रावर आपल्याला लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसून, सदर दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

नियम पाळणे आवश्यक

मुंबईत कोविड – १९चा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढत असून, या दृष्टीने प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे व शासनाद्वारे विविध स्तरीय उपाययोजना नियमितपणे राबवण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे हा देखील याच उपाययोजनांचा एक भाग आहे. मात्र, लस घेतलेली असो किंवा अद्याप घ्यावयाची बाकी असो, या दोन्ही बाबत सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी संबंधित नियमांची परिपूर्ण व काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे किंवा वारंवार हात धुणे या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.

(हेही वाचाः मुंबईत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे शेजारील शहरांच्या चिंतेत वाढ!)

प्रशासनाकडून आवाहन

तसेच कोविड-१९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे ज्यांना कोविड बाधा झाली आहे, अशा व्यक्ती किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण-अलगीकरण करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड विषयक सर्व नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.