Rohit Sharma : रोहित शर्माच्या कर्णधारपदावर टांगती तलवार; लवकरच बीसीसीआयकडून कारवाई होणार

मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाच्या टेस्ट टीममध्ये बदलाची मागणी जोर धरु लागली आहे.

212
Rohit Sharma : बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्माचा फलंदाजीचा जोरदार सराव
Rohit Sharma : बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्माचा फलंदाजीचा जोरदार सराव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये भारताच्या पदरात मोठे अपयश पडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द तब्बल २०९ धावांनी भारताचा पराजय झाला. त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावरून बरेच प्रश्न उपस्थित झाले आहे. अशातच भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यात कोण योग्य आहे विराट कोहली की रोहित शर्मा असा वाद सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून रोहित शर्माची कॅप्टन्सी (Rohit Sharma) काढून घेण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाच्या टेस्ट टीममध्ये बदलाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे आगामी टेस्ट सीरीजमध्ये अनेक सीनियर खेळाडूंना नारळ मिळण्याची शक्यता आहे.

भारत आपली पुढील टेस्ट मॅच वेस्ट इंडिज सोबत खेळणार असून कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) ही शेवटची कसोटी ठरू शकते. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सिलेक्टर्स नव्या कॅप्टनच्या नावावर चर्चा करणार आहेत.

केवळ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या परावभावामुळे नाही तर रोहितची (Rohit Sharma) फिटनेस आणि वय लक्षात घेता बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – WTC Final 2023 : कर्णधारपदाच्या वादावर सौरव गांगुलीने सोडले मौन; म्हणाले….)

…तर कर्णधारपद अढळ राहील

वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितने (Rohit Sharma) चांगली कामगिरी करत धावांचा पाऊस पाडला, तर थोडीफार स्थिती बदलू शकते, अन्यथा कर्णधारपदावर पाणी सोडावे लागणार हे अटळ आहे. रोहित शर्माचा मागच्या काही महिन्यांपासून फॉर्म नाही आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात रोहित शर्माला सूर सापडणं गरजेचं आहे. या खेळीवरून त्याच्या टेस्ट फॉर्मेटमधील भवितव्याबाबत निर्णय होऊ शकतो.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिका संपल्यानंतर डिसेंबरपर्यंत कुठलीही टेस्ट सीरीज खेळली जाणार नाही. त्यामुळे सिलेक्टर्सकडे विचारमंथन करुन निर्णय घेण्यासाठी वेळ आहे. तो पर्यंत चेयरमन सुद्धा सिलेक्शन कमिटीवर येतील. (Rohit Sharma)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.