रिल बनवताना विहीरीत पडून तरुणाचा मृत्यू

ठाकुर्ली येथील पंपहाउस मधील खोल विहीरीत पडून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

214
रिल बनवताना विहीरीत पडून तरुणाचा मृत्यू

सध्या तरुणांमधील रिल बनवण्याचं फॅड दिवसे न् दिवस वाढत आहे. ते इतकं की वेगळं काही करण्याच्या आणि इम्प्रेशन झाडण्याच्या नादात या तरुणांना आपला जीवही गमवावा लागत आहे. डोंबिवलीच्या ठाकुर्ली येथेही अशीच धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे.

ठाकुर्ली येथील पंपहाउस मधील खोल विहीरीत पडून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबर असलेल्या दोन मित्रांनी विष्णूनगर पोलीस स्थानकात याबबत माहिती दिली असता पोलिसांनी शनिवारी (१० जून) रात्री अग्निशामक दलाला कळविले. तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम ३२ तास सुरु होते. अखेर सोमवारी (१२ जून) सायंकाळी अग्निशामक दलाच्या जवानांना विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडला.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या कर्णधारपदावर टांगती तलवार; लवकरच बीसीसीआयकडून कारवाई होणार)

मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल सोहिल शेख ( १८ ) असे खोल विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मुंब्रा येथील बिलाला हा दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रिल काढण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल विहिरीत पडला. हे पाहून त्याचे दोन मित्र जवळील रेल्वे सुरक्षा दलाकडे गेले. मित्रांनी माहिती देताच रेल्वे सुरक्षा दलाने विष्णूनगर पोलिसांना कळविले. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेकडील अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.

स्थानक अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले. तब्बल ३२ तास शोध कार्य सुरु होते. सोमवारी सायंकाळी बिलाला याचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांना बाहेर काढण्यास यश आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.