‘त्या’ जाहिरातीवरून नितेश राणेंचे राऊतांवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले, तुझ्या…

190
'त्या' जाहिरातीवरून नितेश राणेंचे राऊतांवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले, तुझ्या...
'त्या' जाहिरातीवरून नितेश राणेंचे राऊतांवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले, तुझ्या...

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मंगळवारच्या जाहिरातीनंतर बुधवारी, १४ जूनला ‘जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच!’ अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच जाहिरातीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेना-भाजपवर निशाणा साधला होता. त्याला भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देत राऊतांवर घणाघात केला आहे. दुसऱ्यांचा सर्वे आल्यावर तुझ्या बुडाखाली चांगलीच आग लागते, असं म्हणतं नितेश राणेंवर संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

‘महायुतीबाबत झालेल्या सर्वेबद्दल संजय राजाराम राऊत यांनी भाष्य केलं की, हा सर्वे सरकारी बंगल्यामध्ये बसून केला होता का? तुझ्या मालकाला सर्वोकृष्ट मुख्यमंत्री असल्याचे दर तीन महिन्याला पारितोषिक मिळायचं, तो काय कर्जतच्या फार्महाऊसमध्ये बसून केला होता का? अडीच वर्ष तुझ्या मालकामुळे महाराष्ट्र अतिशय देशोधडीला लागला. महाराष्ट्र पिछाडीला गेला. तरी तुझ्या मालकाला सर्वोकृष्ट मुख्यमंत्री असल्याचे पारितोषिक मिळायचे. दर तीन महिन्यांनी सर्वे करायचा. तो काय कर्जेतचा फार्महाऊसवर झालेला की दिनो मोरयाच्या घरी व्हायचा, याची जरा माहिती आम्हालाही दे. दुसऱ्यांचा सर्वे आल्यावर तुझ्या बुडाखाली चांगलीच आग लागते. पण तुझा मालक आणि मालकाचा मुलगा, बॉलिवूडच्या कलाकारांना किती पैसे द्यायचा, स्वतःची लाल करण्यासाठी याची माहिती आम्ही देऊ का? त्याच्या एजन्सीची माहिती देऊ? जेणेकरून तुम्हालाही कळेल, करोडोचा पैसा देऊन हे बॉलिवूडचे कलाकार तुझा मालक आणि तुझ्या मालकाच्या मुलाची किती लाल करायचे आणि त्याच्यासाठी तुम्ही करोडो कसे मोजायचे, याची माहिती तुम्हाला देतो. आमचं सरकार हे अतिशय सक्षम पद्धतीने काम करतंय आणि महाराष्ट्राच्या मनात असलेलं काम करत असल्यामुळे गतिमान महाराष्ट्र घेऊन जात असल्यामुळे हे असे सर्वे येतायत. म्हणून जेवढे जास्त सर्वे हे तू पचवशील, तेवढं जास्त तुझं पोट साफ होईल, नाहीतर तुला हाजमोलाचा डब्बा पाठवून देतो घरी आणि ते खात बसं आणि सर्वे वाचत बसं,’ असं निलेश राणे म्हणाले.

नेमकी जाहिरात काय?

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मंगळवारच्या जाहिरातीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले. या जाहिरातीवर भाजपच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या जाहिरातीमुळे टीका करण्यासाठी विरोधकांना आयत कोलीत मिळालं होत. त्यानंतर बुधवारी, १४ जूनला शिवसेनेकडून नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मंगळवारच्या जाहिरातीमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो छापण्यात आला होता आणि एका सर्वेक्षणाचा दाखला देऊन राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती दर्शवल्याचे सांगितले होते. त्यानंतर बुधवारच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासह शिंदे-फडणवीसांचा फोटो छापण्यात आला असून ४९.३० टक्के जनतेचा शिंदे-भाजप यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.