Islam : 400 लोकांचे धर्मांतर केल्याची मोहसीनची कबुली; आता आव्हाड काय उत्तर देणार?

550

धर्मांतर प्रकरणी सध्या मुंब्रा परिसर संशयाच्या भोव-यात सापडला आहे. यापूर्वीही मुंब्रा चर्चेत आला होता. कारण इशरत जहॅां ही मुंब्रामध्ये राहणारी होती. ही इशरत पाकपुरस्कृत लष्कर ए तोयबा या दहशतवाही संघटनांशी संबंधीत होती. आता मुंब्राचे नाव हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याच्या प्रकरणी चर्चेला आले आहे. मात्र मुंब्रामध्ये धर्मांतर होतच नाही, असे ठणकावूण सांगण्यात मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुढाकार असतो, पण आता मुंब्रातील धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी मोहसीनने ४०० जणांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यावर काय उत्तर देणार?

आव्हाड हे मुंब्राचे आमदार आहेत, तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही होते. सत्ता गेल्यानंतर आव्हाड जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगुलचालन करणा-या पोस्ट सोशल मिडीयातून करतात. जेव्हा भाजप-शिवसेना युती सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक लाख लव्ह जिहादची प्रकरणे समोर आल्याचा उल्लेख केला. तेव्हाही आव्हाड यांनी याला विरोध करत हा अपप्रचार असल्याचे म्हटले होते. मात्र आता ठाणे-पालघरसह मुंबई महानगर क्षेत्रात ४०० जणांचे धर्मांतर केल्याचा आरोप होऊ लागला आहे.

आव्हाड यांचे ट्वीट

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे की, यामागे वाईट हेतू असल्याचे मी सुरुवातीपासून सांगत आहे. हिंदूंची बदनामी करणे आणि मुंब्य्रात दहशतीचे वातावरण निर्माण करून माझी बदनामी करणे हे होते. कळवा मुंब्य्रातील जनता गेल्या 14 वर्षात झालेला बदल कधीच विसरणार नाही. मी मंत्री असताना आणलेला निधी मुख्यमंत्री रद्द करतात, याचा सरळ अर्थ निधी रद्द करून मुंब्य्राचे नुकसान करत आहे. मला मारा पण कळवा मुंब्य्रातील लोकांचे नुकसान करू नका, आता मुंब्य्रातील जनतेला माफी मागायला सांगा.

जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटसोबत एक स्क्रीन शॉट जोडला असून, त्यात लिहिले आहे, ठाणे पोलीस ने क्या जानकरी दी? ठाणे डीसीपी (झोन १) गणेश गावडे यांनी सांगितले की, आम्ही आरोपी शाहनवाज खानची चौकशी केली असता, मुंब्रा येथे धर्मांतराची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

jitendra

आव्हाड माफी मागणार का?

गेम जिहादचा आरोपी शाहनवाज खानच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड यांचे हे ट्विट आले आहे. मुंब्रामध्ये राहणारा शाहनवाज खान याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील कवी नगर येथे धर्मांतराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये तीन हिंदू आणि एक जैन अल्पवयीनांवर धर्मांतराचा आरोप आहे. पण, जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रात धर्मांतर झाले नसल्याचे सांगत याचा इन्कार केला. पण, वसईच्या राजेशला मोहम्मद रियाझ बनवणाऱ्या मोहसीनच्या अटकेनंतर आव्हाड यांच्या दाव्यांवर पाणी फिरले आहे. अशा परिस्थितीत जितेंद्र आव्हाड एखाद्या समाजाला वाचवण्यासाठी हिंदू समाजाची माफी मागणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.