चुकीचे इंजेक्शन बेतले चिमुकलीच्या जीवावर; संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड

195
चुकीचे इंजेक्शन बेतले चिमुकलीच्या जीवावर; संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड
चुकीचे इंजेक्शन बेतले चिमुकलीच्या जीवावर; संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड

भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथे सनलाईट नावाचे खासगी रुग्णालय आहे. राम नगर परिसरात राहणाऱ्या नितीन कांबळेंची चार वर्षांची मुलगी श्रध्दाला उलट्या होत असल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री आठच्या सुमारास श्रद्धाची प्रकृती अचानक बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाला सलाईनमधून इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर श्रद्धा बेशुद्ध होऊन निपचित पडली व त्यानंतर डॉक्टरांनी लगेच तिला मृत घोषित केले. हे कळताच रुग्णालयात असलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरू केला. त्यानंतर तेथे जमा झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टर परिचारिकेला मारहाण केली आहे.

(हेही वाचा – Islam : 400 लोकांचे धर्मांतर केल्याची मोहसीनची कबुली; आता आव्हाड काय उत्तर देणार?)

या घटनेची माहिती मिळताच भिंवडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणल्यानंतर श्रद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करत अकस्मात मृत्यूची नोंद केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. इंजेक्शनचे तीन डोज लागोपाठ दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला तसेच डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर रुग्णालयाच्या तोडफोड प्रकरणी डॉक्टरांनी नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून भोईवाडा पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार झाल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चिमुरडीच्या या करुण अंताला डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय व्यवस्थापकांना जबाबदार धरत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. तसेच डॉक्टर व परिचारिकांनादेखील मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. चिमुरडीच्या आकस्मित जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.