शिवसेनेची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा होता, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत असे प्रकार यापुढे टाळले पाहिजेत, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला दिला.
बावनकुळे म्हणाले, शिवसेनेच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. मंगळवारचा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न बुधवारी झाला, मात्र पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सेनेच्या जाहिरातीमुळे दोन्ही पक्षात थोडे मतभेद झाले मात्र मनभेद नाहीत. दोन सख्ख्या भावांमध्ये देखील मतभेद होतात. शिवसेना आणि भाजप हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत, त्यामुळे मतभेद होणे साहजिक आहे. मात्र हा विषय आता संपला आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
(हेही वाचा – नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटींची तरतूद – मंगलप्रभात लोढा)
बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी कौतुक केले. देवेंद्र फडणवीस भाजपाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी राज्यात लाखो कार्यकर्त्यांना घडवले असून पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे जाहिरात प्रकरणामुळे भाजपच्या पदाधिकारी, आमदार, खासदार यांचे मन दुखावले आहे. शिंदे उत्कृष्ट आहेत पण त्यांची फडणवीस यांच्याशी तुलना योग्य नाही. परंतु हा विषय आता संपलेला आहे, असे सांगत बावनकुळे यांनी या वादावर पडदा टाकला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community