शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे सेना-भाजपा युतीत नाराजीनाट्य सुरू असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा शुक्रवारी महाराष्ट्रात येत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीला ते हजेरी लावतील.
नड्डा यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर दर्शन ते आरोग्य व क्रीडा क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींच्या भेटीतून सामाजिक कानोसा देखील घेतला जाणार आहे. भाजपाने राज्यात ४५ लोकसभा आणि २०० विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी केली आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी, १६ जूनला नाशिकच्या ठक्कर डोम येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे.
(हेही वाचा – नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटींची तरतूद – मंगलप्रभात लोढा)
अध्यक्ष नड्डा यांचा हा नियमित दौरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी बैठक होत असल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे. मात्र आगामी लोकसभेसाठी प्रदेश स्तरावर सुरू असलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी ते येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही पहा –