Game Jihad : खेळ जिंकायचा असेल, तर 5 वेळा नमाज पठण करा; धर्मांतर करणाऱ्या टोळीची मोडस ऑपरेंडी

181

ऑनलाइन खेळाद्वारे अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणाऱ्या टोळीबाबत गाझियाबाद पोलिसांनी नवे खुलासे केले आहेत. या टोळीतील काही जणांनी हिंदू नावाने ओळखपत्रही बनवले होते. या टोळीकडून सुरुवातीला हिंदू मुलांना इस्लामबद्दल माहिती देण्यासाठी झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवण्यात आले आणि नंतर पाकिस्तानी मौलाना तारिक जमीलचे व्हिडिओ कट्टरपंथी बनवण्यासाठी दाखवण्यात आले. धर्मांतराच्या प्रक्रियेदरम्यान मुलांना त्यांच्या कुटुंबापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला.

गाझियाबादमधील कवी नगर पोलिस ठाण्यामध्ये ३० मे २०२३ रोजी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये १ जैन आणि ३ हिंदू अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्यात आल्याचे म्हटले आहे. या सर्वांचे ५ वेळा नमाज अदा करण्यासाठी आणि इतर इस्लामिक पद्धतींचे पालन करण्यासाठी ब्रेनवॉश करण्यात आले. या टोळीचा मुख्य सूत्रधार शाहनवाज खान उर्फ बद्दो याला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली. तर दुसरीकडे, दुसरा आरोपी मौलवी अब्दुल रहमान याला गाझियाबादच्या बापुधाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय नगर येथून अटक करण्यात आली.

(हेही वाचा Islam : हिंदू महिलेच्या पाठी लागला होता झाकीर; त्रासाला कंटाळून अ‍ॅसिड पिऊन केली आत्महत्या)

तपासणी दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, धर्मांतर करणाऱ्यांनी अशा मुलांवर लक्ष केंद्रित केले जे ऑनलाईन खेळ खेळण्यास जास्त प्राधान्य देतात. या मुलांना आरोपींनी ‘फोर्टनाइट’ आणि ‘डिस्कॉर्ड’सारखे गेम खेळण्याचे आमिष दाखवले. डिसकॉर्ड एक विनामूल्य मजकूर, आवाज आणि व्हिडिओ चॅट अॅप आहे. ते विनामूल्य असल्याने मुलांची पसंती अधिक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.