भुताटकी हा प्रकार आपल्याला काही नवीन नाही. जगात भूत आहे की नाही यावर लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काही जण त्यावर विश्वास ठेवतात तर काही जणांना असल्या गोष्टी अजिबात पटत नाहीत. पण विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवला तर भूत ही अंधश्रद्धाच आहे हे दिसून येतं. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशाच एका रेल्वे स्टेशनविषयी सांगणार आहोत.
हे रेल्वे स्टेशन झपाटलेलं आहे असे तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील बेगुनकोदर नावचं हे रेल्वे स्टेशन आजच्या तारखेतही बंद आहे. इथे एकही गाडी थांबत नाही. याउलट हे स्टेशन जवळ आलं की गाडीची स्पीड वाढवली जाते जेणेकरून ते स्टेशन लवकरात लवकर पार करता येईल.
1960 साली जेव्हा हे रेल्वे स्टेशन नव्याने सुरू झाले तेव्हा तिथे खूप गर्दी असायची पण सात वर्षानंतर त्याठिकाणी तिथल्या स्टेशनमास्तरला हडळ दिसल्याचे सांगितले जाते. बऱ्याच लोकांनी ही घटना खरी मानली तर काही लोकांनी हे खोटे असल्याचे सांगितले. पण काही दिवसांनी त्या स्टेशनमास्तरचे संपूर्ण कुटुंब रहस्यमयरित्या मृत पावल्याचे आढळून आले.
ही घटना रेल्वे प्रशासनाकडे पोहोचली त्यांनतर हे स्टेशन बंद करण्यात आले. 42 वर्षे हे स्टेशन बंद राहिल्यानंतर त्यावेळच्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी हे स्टेशन 2009 साली पुन्हा सुरू केले. पण तरीसुद्धा रेल्वे स्टाफपैकी कोणीही या स्टेशनवर राहायला तयार नाही म्हणून हे स्टेशन एका प्रायव्हेट फर्मद्वारे चालवले जाते. सध्या या स्टेशनवर 10 गाड्या थांबतात.
Join Our WhatsApp Community