India : भारतातील ‘या’ बर्म्युडा ट्रॅंगलबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कधीही इथे जाऊ नका

358
भारत हा ऋषीमुनींचा, गूढ आणि समर्थ इतिहास असलेला देश आहे. जगात असं काय आहे, जे भारतात नाही. जग कसं असावं याचं मॉडेल म्हणजे भारत. तुम्ही बर्म्युडा ट्रॅंगलबद्दल ऐकलं असेल पण तुम्हाला जर आम्ही सांगितलं की भारतातही एक बर्म्युडा ट्रॅंगल आहे तर तुमचा विश्वास बसेल का?
भारतातील शारंगीला खोऱ्याबद्दल एक विचित्र गोष्ट सांगितली जाते. असे म्हणतात की, या खोऱ्यामध्ये जाणारे लोक परतून येत नाहीत. तसेच या खोऱ्याच्या वर वातावरणामध्ये वेळ थांबते त्यामुळे हे खोरे असलेल्या वरच्या भागातून विमानांची ये-जा सुद्धा बंद असते. या खोऱ्याच्या रहस्यमय गोष्टी सांगणारी अनेक पुस्तकेही लिहिली गेली आहेत. या पुस्तकांमधून अस सांगितलं जातं की,  कोणीही या खोऱ्यामध्ये चुकून जरी गेले तरी परत फिरून येऊ शकत नाही.
या खोऱ्याची तुलना अमेरिकेच्या पूर्व तटावर स्थित असलेल्या बर्म्युडा ट्रँगलशी केली जाते. बर्म्युडा ट्रँगल हा समुद्रात असलेला एक त्रिकोणी आकाराचा पट्टा आहे. जिथे कोणतेही जहाज किंवा विमान गेले तर ते परत येत नाही. बर्म्युडा ट्रँगलच्या कहाण्या जगप्रसिद्ध आहेत.
भारतातील अशी कित्येक ठिकाणे आहेत जी रहस्यमयी आहेत. अशा कितीतरी ठिकाणांचे आकलन विज्ञानालासुद्धा करता आलेले नाही. भारतातील अरुणाचल प्रदेश येथे वसलेल्या या खोऱ्याला दुसरा बर्म्युडा ट्रँगल असेही म्हटले जाते. या खोऱ्याच्या संबंध भारत किंवा तिबेट यांच्याशी नसून एका वेगळ्याच जगाशी आहे. असे इथे राहणाऱ्या स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.