Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू २२ जखमी

177
Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू २२ जखमी
Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू २२ जखमी

अरबी समुद्रात १० दिवसांपूर्वी निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छमधील जखाऊ बंदरावर धडकले. गुजरातमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.

गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बिपरजॉयमुळे जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे. कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जखाऊ आणि मांडवी येथे अनेक झाडे, होर्डिंग्ज आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. भावनगर जिल्ह्यात पुराच्या दरीत अडकलेल्या शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. त्याचवेळी देवभूमी द्वारका येथे झाडे पडल्याने ३ जण जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – Biporjoy Cyclone: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले बिपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रसह ‘या’ आठ राज्यांमध्ये वादळाचा प्रभाव)

बिपरजॉय वादळाचा प्रभाव गुजरातच्या अनेक भागात दिसून आला आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वादळामुळे अनेक झाडे व खांब उन्मळून पडले आहेत. अनेक भागातील दिवे बंद झाले आहेत. दरम्यान वादळ सध्या १३-१४ किमी वेगाने पुढे सरकत आहे. वादळामुळे शुक्रवारी कच्छ, द्वारका आणि जामनगरमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.