गुजरातमध्ये गुरुवारी धडकलेल्या बिपरजॉय वादाळामुळे पश्चिम रेल्वेने दक्षता म्हणून ९९ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आगामी १८ जूनपर्यंत या गाड्या रद्द राहतील असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री गुजरात किनारपट्टीवर धडकले. या वादळाने मोठा विध्वसं गुजरातच्या किनारपट्टीवर घडवला आहे. चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झालेत. तर २८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच वादळामुळे गुजरातच्या ९५० गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वादळ येण्यापूर्वी तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान हे वादळ आता राजस्थानच्या दिशेने जात असून हे वादळ दोन दिवस कायम राहणार आहे. या वादळामुळे गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
#WRUpdates #CycloneBiparjoyUpdate
For the kind attention of passengers.
The following trains of 16/06/2023 have been Fully Cancelled/Short-Originate by WR as a precautionary measure in the cyclone-prone areas over Western Railway.@RailMinIndia pic.twitter.com/NcxSLeqK7a
— Western Railway (@WesternRly) June 16, 2023
(हेही वाचा – Biparjoy Cyclone: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले बिपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रसह ‘या’ आठ राज्यांमध्ये वादळाचा प्रभाव)
यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने १८ जूनपर्यंत तब्बल ९९ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय ३ गाड्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यापूर्वी थांबवण्यात आल्या आहेत. इतर ७ गाड्या त्यांच्या निश्चित स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकावरून चालवल्या जाणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ९९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ३९ गाड्या या त्यांच्या स्थानकापूर्वी थांबवण्यात येणार आहेत. या वादळाचा जखाऊ बंदरासह नारायण सरोवर, नलिया, मांडवी, द्वारका, पोरबंदर, जामनगर, मोरबी आदी ठिकाणांना तडाखा बसला आहे. किनारपट्टीवरील सखल भागांमध्ये वादळाशी संलग्न दोन ते तीन मीटर उंचीच्या समुद्राच्या लाटांचे पाणी शिरले असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community