जर तुम्हाला एखादा आयकर विभागाच्या नावाने इमेल आला आणि कर परतावा (टॅक्स रिटर्न) मिळवण्यासाठी तुम्हाला एखादा ऑनलाईन फॉर्म पाठवला जात असेल, ज्यामध्ये तुमची इत्यंभूत माहिती विचारली असेल, तर सावधान अजिबात तो फॉर्म भरू नका, तो ईमेल आणि तो फॉर्म खोटा असून यामुळे स्टेट बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्सिस आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांच्या खातेदारांची फसवणूक होत आहे.
अशी होते फसवणूक!
- बँक खातेदारांच्या ईमेल, मोबाईलवर लिंक पाठवली जाते.
- ही लिंक पाठवणारे अमेरिका आणि फ्रांस स्थित लिंक जनरेट करत आहेत.
- कर परतावा मिळवण्यासाठी खातेदारांना संबंधित फॉर्म भरण्याचे आवाहन केले जाते.
- त्यात पूर्ण नाव, पॅन, आधार, पत्ता, पिनकोड, जन्म तारीख, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, आयएफएससी कोड, डेबिट कार्ड नंबर, सीव्हीसी नंबर मागितला जातो.
- ही माहिती भरताच तुमच्या खात्यातील पैसे परस्पर काढले जातात. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींना लक्ष्य करण्यात येत आहे.
Taxpayers Beware!
Pl do not click on any such fake link which promises to give refund. These phishing messages are not sent by ITDeptt. Any response is to be made only by logging into your e-filing account and NEVER on email/links/forms.
More details on:https://t.co/90VSq32w0K pic.twitter.com/SvnymRxeUR— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 21, 2020
आयकर विभागाचे स्पष्टीकरण!
या प्रकरणी आयकर विभागाने तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. करदात्यांनो सावधान! कृपया तुम्हाला कर परताव्या संबंधी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. ती लिंक आयकर विभागाने पाठवलेली नाही. तुमच्या इ -फायलिंग खात्यातूनच आम्ही तुमच्याशी संबंध ठेवतो. ई-मेल लिंक, मोबाईल संदेशाद्वारे नाही, असे आयकर विभागाने म्हटले आहे.
(हेही वाचा : गल्लीतले दिल्लीत, दिल्लीत सुपर कॅबिनेटला जोर!)
Join Our WhatsApp Community