मुंबईतील कांदिवली भागातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये शुक्रवार १६ जून रोजी सकाळच्या प्रार्थनेनंतर अजान लावण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही पालकांनी यावर आक्षेप घेतला असून शिवसेनेने शाळेविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबत शाळेने पुन्हा अशाप्रकारे लाऊड स्पिकरवर अजान लावू नये असे लेखी स्वरुपात पत्र शिवसेनेकडून देण्यात आले आहे. दरम्यान ज्या शिक्षिकेने अजान लावली त्यांना निलंबित केल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली आहे.
शाळेने काय म्हटले?
शाळेच्या म्हणण्यानुसार, “आमच्या शाळेत प्रत्येक धर्माच्या प्रार्थना विद्यार्थांना समजाव्या यासाठी आम्ही लाऊड स्पिकर लावतो. मग त्यात गायत्री मंत्र, कॅरोल सिंगिंग, किंवा इतर धर्मियांच्या प्रार्थना समजण्यासाठी हा उपक्रम असतो. आज लाऊड स्पिकरवर अजान लावण्यात आली. मात्र पालकांच्या भावना समजून घेता आम्ही अजान बंद केली. यापुढे आता शाळेत अशाप्रकारे अजान लावणार नाही असे आश्वासन आम्ही सर्वांना देतो.”
(हेही वाचा – Muslim : उत्तराखंडमध्ये हाफिजची विकृती; संतप्त लोकांनी मुंडन करुन केले पोलिसांच्या हवाली)
शिक्षकावर कारवाईची मागणी
‘शाळेत जाणीवपूर्वक अजान लावली. अजान लावणारे शिक्षक अल्पसंख्यांक आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांचे नाव समोर आणले गेले नाही. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पालकांकडून करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community