‘लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर, हेडगेवार काढू शकत नाही’; कर्नाटक काँग्रेसच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

183
'लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर, हेगडेवार काढू शकत नाही'; कर्नाटक काँग्रेसच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया
'लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर, हेगडेवार काढू शकत नाही'; कर्नाटक काँग्रेसच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

कर्नाटकात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस सरकारने भाजप काळात घेतलेल्या निर्णयांना बदलण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने मंजूर केलेला धर्मांतर विरोधी कायदा काँग्रेस सरकारने रद्द केल्या आहे. त्याचबरोबर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि केशव हेडगेवार यांचा धडाही वगळण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर, हेगडेवार काढू शकत नाही. तसेच यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना सवाल केला.

कर्नाटक काँग्रेस सरकारच्या निर्णयावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एखादा धडा तुम्ही वगळू शकता, पण लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर, हेगडेवार काढू शकत नाही. एकही स्वातंत्र संग्राम सेनानी हा लोकांच्या मनातून तुम्ही काढू शकत नाही. परंतु काँग्रेस सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकांच लांगूनचालन करण्याकरिता ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटक सरकार घेत आहेत, माझा महाविकास आघाडीला सवाल आहे, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?”

(हेही वाचा – Veer Savarkar : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा हिंदुद्वेष; सत्तेत येताच वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमातून वगळला )

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

“आता तुमची (उद्धव ठाकरे) नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे सांगा. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पुसायला निघाले आहेत, ते धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन देण्यास निघाले आहेत, तर आता तुमचे नेमके मत काय आहे हे सांगायला हवे. सत्तेसाठी तुम्ही हा समझोता केला हे यावरुन स्पष्ट होत आहे. पण हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचेही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसू शकणार नाहीत,” असे म्हणतं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.