घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित नागरी सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना अंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ आणि नदी पुनरुज्जीवनाचे महत्त्व या विषयावर घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे. एच-पूर्व विभाग कार्यालयात याबाबतची कार्यशाळा पार पडली असून यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या “मुंबई नदी पुनरुज्जीवन परिक्रमा” कार्यक्रमाच्या संयोजका स्नेहल दोंदे यांनी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) चंदा जाधव व प्रमुख अभियंता (घ क व्य ) प्रशांत तायशेटये यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभावीपणे कामकाज असला तरी मुख्यतः घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित नागरी सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना आखण्याचा प्रयत्न होत आहे. या उपाययोजना अंतर्गत १५ जून २०२३ रोजी राज्य शासनाच्या “मुंबई नदी पुनरुज्जीवन परिक्रमा” कार्यक्रमाच्या संयोजका स्नेहल दोंदे यांनी ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ आणि नदी पुनरुज्जीवनाचे महत्त्व या विषयावर घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी एच-पूर्व विभाग येथे कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यक्रमाला सहायक मुख्य पर्यवेक्षक, दुय्यम अभियंता, कनिष्ठ पर्यवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक आणि स्वच्छता दुत उपस्थित होते. डॉ. स्नेहल दोंदे यांनी उपस्थितांना मुंबईतील महत्वांच्या नदया आणि प्रदुषण या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सुका कचरा वर्गीकरण केंद्राविषयीही माहिती दिली.