मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये विविध ठिकाणी १६ फ्लड गेट्स लावण्यात येत आहे. विद्यमान पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ही दोन पटीने वाढणार आहे. सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या वाहिन्या आणखी १०० मीटर पुढे समुद्रात सोडण्यासाठीची व्यवस्थाही यामध्ये करण्यात आली आहे. सध्याच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची क्षमता अनेक ठिकाणी २ हजार मिमी तर काही ठिकाणी २,५०० मिमी करण्यात आली आहे. तसेच फ्लड गेटच्या माध्यमातून समुद्राचे पाणी भरतीच्या काळात रोखण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या पॅकेज १ आणि २ मध्ये प्रत्येकी ६ तसेच पॅकेज ४ मध्ये ४ फ्लड गेट्स लावण्यात आले आहेत. त्यापैकी ७ ठिकाणी काम पूर्ण झाले असून उर्वरीत ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे.
भरतीच्या काळात मुंबई शहरात समुद्राचे पाणी शिरू नये म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाने फ्लड गेट्सची यंत्रणा उभारली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये ही यंत्रणा कार्यरत होणार आहे. महत्वाचे म्हणजे आधीच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या क्षमतेच्या तुलनेत अधिक क्षमतेच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. एकूण १६ फ्लड गेट्सच्या वापराच्या माध्यमातून मुंबईत भरतीच्या काळात शिरणारे पाणी रोखणे शक्य होणार आहे. अतिवृष्टीच्या काळात शहरातील पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या टप्प्यात पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या तुलनेत दोन पट क्षमतावाढ करण्यात आली आहे. एकूण १६ ठिकाणी फ्लड गेट्स या यंत्रणेसाठी लावण्यात आले आहेत. या फ्लड गेट्सच्या माध्यमातून भरतीच्या काळात समुद्रातून शहरात शिरणारे पाणी रोखणे शक्य होणार आहे. एकूण १४ ठिकाणी फ्लड गेट्सच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून मरीन ड्राईव्ह परिसरात या फ्लड गेटच्या कामासाठी लवकरच सुरूवात होणार आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये विविध ठिकाणी १६ फ्लडगेट्स लावण्यात येतील. विद्यमान पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ही दोन पटीने वाढणार आहे. सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या वाहिन्या आणखी १०० मीटर पुढे समुद्रात सोडण्यासाठीची व्यवस्थाही यामध्ये करण्यात आली आहे. सध्याच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची क्षमता अनेक ठिकाणी २ हजार मिमी तर काही ठिकाणी २५०० मिमी करण्यात आली आहे. तसेच फ्लड गेटच्या माध्यमातून समुद्राचे पाणी भरतीच्या काळात रोखण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या पॅकेज १ आणि २ मध्ये प्रत्येकी ६ तसेच पॅकेज ४ मध्ये ४ फ्लड गेट्स लावण्यात आले आहेत. त्यापैकी ७ ठिकाणी काम पूर्ण झाले असून उर्वरीत ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. प्रकल्पाच्या एकूण चार पॅकेजेसमध्ये १६ फ्लड गेट्स लावणार असल्याची माहिती उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर यांनी दिली. मुंबई शहरात समुद्राचे पाणी शिरण्यापासून दिलासा मिळण्यासाठी फ्लडगेट्सची कामगिरी महत्वाची ठरेल, असे मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community