बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केलं आहे. ‘बिपरजॉय’च्या (Biporjoy Cyclone) प्रभावामुळे गुजरातमधील अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) गुरुवार १५ जून रोजी गुजरात येथे धडकलं. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने योग्य ती खबरदारी घेतली. किनारी भागातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवले. आत्तापर्यंत ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफची ३३ पथके तैनात करण्यात आली आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळं (Biporjoy Cyclone) गुजरातमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं कच्छ आणि सौराष्ट्राताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळामुळं आतापर्यंत २३ जण जखमी झाले आहेत. तर राज्यातील किमान १ हजार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
(हेही वाचा – Love Jihad : बंदुकीचा धाक दाखवून १३ वर्षीय हिंदू मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न; दोन तरुणांना अटक)
वादळाचे रौद्र रूप…
गुजरातमध्ये वादळ (Biporjoy Cyclone) येण्यापूर्वी दोन जणांचा मृत्यू झाला होता. परंतु वादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुजरात प्रशासन आणि इतर यंत्रणांनी नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे. वादळामुळं राज्यातील किमान एक हजार गावांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी ४० टक्के वीज संकट एकट्या कच्छ जिल्ह्यात आहे. तर ५०० कच्च्या झोपड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान काही पक्क्या घरांचेही नुकसान झाले आहे. ८०० झाडे उन्मळून पडली आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आणि बाधितांना मदत करण्यासाठी काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
#WATCH || #Gujarat : Strong winds are blowing in Navsari, and high waves are rising in the sea #CycloneBiparjoy #biporjoycyclone #Biparjoy #CycloneAlert #CycloneBiparjoyUpdate pic.twitter.com/Ikj8vhAYpN
— Rubika liyaquatFans (@RubikaLiyakatFC) June 12, 2023
‘या’ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) परिणाम दिसून येणार आहे. पुढील काही दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागानं केलं आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळं गुजरातमधील किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community