बीडमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार; दोन जण जखमी

शुक्रवारी (१६ जून) रात्री उशिरा बीड शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या दरम्यान दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून हाणामारी झाली.

233
Firing : पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाकडून एकावर गोळीबार

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. सतत दोन गटांमध्ये वाद निर्माण होत आहे. काही ठिकाणी शुल्लक कारण देखील या वादामागचे कारण ठरत आहे. अशातच राज्यातील बीड शहरात देखील दोन गटांमध्ये वाद होऊन गोळीबार झाला. शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दोन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी पोलीस प्रशासन तळ ठोकून आहे.

शुक्रवारी (१६ जून) रात्री उशिरा बीड शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या दरम्यान दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारीचं रूपांतर नंतर थेट गोळीबारात झालं. गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते. या दोघांवरही बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

(हेही वाचा – Jammu Kashmir : सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा)

या दोन गटांमध्ये वाद होण्याचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र रात्री झालेल्या या गोळीबाराने शहरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत घटनेच्या ठिकाणी तळ ठोकला. त्याचबरोबर या दोन्हीही गटातील लोकांचा प्रशासन शोध घेत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती रात्री उशिरा शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाला आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.