उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात स्वातंत्र्यसैनिक भास्कर सांभराव नायगांवकर यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर, अभिमन्यू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – बीडमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार; दोन जण जखमी)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नायगांवकर यांच्याशी संवाद साधतांना त्यांचे स्वातंत्र्य लढयातील अनुभव जाणून घेतले. नायगावकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी उस्मानाबाद येथे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची, मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याची, स्मारके उभारण्याची मागणी केली. याप्रसंगी चिलवडी येथील स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव यांनीही फडणवीसांसोबत संवाद साधला.
🕕6pm | 16-06-2023 📍Dharashiv | संध्या ६ वा | १६-०६-२०२३ 📍 धाराशिव
🔸Sampark Se Samarthan: Residence of freedom fighter Shri Bhaskarrao Naigaonkar ji. Freedom Fighter Bubasaheb Jadhav also present.
🔸स्वातंत्र्यसेनानी श्री भास्करराव नायगांवकर जी यांच्या निवासस्थानी ‘संपर्क से… pic.twitter.com/pnT63aY13p— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2023
त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात चिलवडी व उस्मानाबाद जिल्ह्याच्या योगदानाबाबत माहिती दिली. यावेळी जाधव यांनी “असे झुंजलो आम्ही” आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली “वैभवशाली उस्मानाबाद” ही पुस्तके भेट दिली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नायगांवकर यांच्या “माझा मी चा शोध” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी “हा एक जन्म”, “एक जिज्ञासा” आणि “सागरातील निवडक रत्ने” ही पुस्तके उपमुख्यमंत्र्यांना भेट दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community