पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा अघोरी प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्ब्याचे चटके दिल्याने त्याची प्रकृती आणखी ढासळली असून बाळाला जगवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत आहेत.
पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत होते. त्यावर उपाय म्हणून त्याच्या पोटावर बिब्ब्याचे चटके देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानवीय प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर या चिमुकलीला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा – Ayodhya Poul : ठाकरे गटाच्या आयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक अन् मारहाण; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…)
मिळालेल्या माहितीनुसार, घाटंजी तालुक्यातील पारवा पीएचसीमध्ये ६ जून रोजी या बाळाचा जन्म झाला. प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला. बाळाला घरी आणण्यात आलं. मात्र घरी आल्यानंतर बाळ एकसारखं रडत होतं. त्यातच आई-वडिलांनी बाळाला डॉक्टरांकडे न नेता गावातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितल्यानुसार आई-वडिलांनी अवघ्या पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले. मात्र या अमानवी आणि अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती सुधारली नाहीच उलट आणखीच चिंताजनक बनली आहे.
अमरावतीमध्ये तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकाराची घटना घडली होती. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरून पालकांनी हा अघोरी प्रकार केला होता. वारंवार आवाहन आणि जनजागृती करूनही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community