पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव देण्याचा घाट?

हे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून, पवारांचे नातू रोहित या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

177
पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव देण्याचा घाट?

पुणे येथील गहुंजे स्टेडियमला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्याचा घाट घातला जात आहे. हे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून, पवारांचे नातू रोहित या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कार्यकारिणीत तसा ठराव आणून तो एकमताने मंजूर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते.

दुसरीकडे, याचे श्रेय एकट्या रोहित पवार यांना मिळू नये म्हणून राष्ट्रवादीतील अजित पवार गट सक्रिय झाला आहे. अजित पवार यांचे समर्थक असलेल्या धनंजय मुंडे यांनी अध्यक्ष रोहित पवार यांना पत्र लिहून शरद पवार यांचे नाव गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाला द्यावे, अशी मागणी केली आहे. मागणी करून शांत न बसता ते पत्र त्यांनी सर्वत्र व्हायरल केले आहे. त्यामुळे रोहित यांचे निम्मे क्रेडिट धनंजय मुंडे यांनी आधीच खाल्ल्याच्या चर्चा आहेत.

(हेही वाचा – Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?)

रोहित पवार यांना लिहिलेल्या पत्रात धनंजय मुंडे म्हणतात, ”भारतीय क्रिकेट विश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय ते अगदी आयसीसीच्या अध्यक्ष पदावर त्यांनी काम केले. भारताच्या महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा व संधी मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूना निवृत्ती नंतर पेन्शन मिळवून देणे याप्रकारच्या अनेक सोयी-सुविधा व संधी त्यांनी क्रिकेटर्सला मिळवून दिल्या. क्रीडा विश्वातील खो-खो, कबड्डी सारख्या मातीतील खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला. या कार्याचा सन्मान म्हणून पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास शरद पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी विनंती मी आपणास करत आहे.”

गहुंजे स्टेडियमच्या नामकरणाचा इतिहास

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाचे उद्घाटन १ एप्रिल २०१२ रोजी तत्कालीन आयसीसी अध्यक्ष आणि कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. २०१३ मध्ये सहारा इंडिया परिवारने २०० कोटी रुपयांना नामकरणाचे अधिकार विकत घेतले आणि या मैदानाचे नामकरण सुब्रत रॉय सहारा स्टेडियम असे करण्यात आले. तथापि, करारानुसार ठरलेली रक्कम देण्यास ही कंपनी असमर्थ ठरल्याने मैदानाचे नाव बदलून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.