देशात बांगलादेशी मुसलमानांची मोठ्या संख्येने घुसखोरी झाली आहे. मुंबईत बांगलादेशींची लक्षावधी संख्या आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे मुंबईतही काही भाग मुसलमानबहुल बनले आहेत. अशा मुंबईत खुद्द बांगलादेश नावाने नगर वसलेले आहे, अर्थात त्यात मुसलमानांची संख्या किती आहे, हे पाहावे लागेल, परंतु या भागाला बांगलादेश नाव देण्यात आले आहे. बांगलादेश हे भाईंदरच्या उत्तनमध्ये वसलेले आहे. हे नावही प्रशासनाने सर्व कागदपत्रांवर मान्य केले आहे. याला प्रशासकीय निष्काळजीपणा म्हणावा का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंबईची सीमा ओलांडताच मीरा भाईंदर परिसर सुरू होतो. त्याला छोटी मुंबई म्हणतात, मुंबईत नोकरी व्यवसाय करणारे मध्यमवर्गीय लोक या छोट्या शहरात स्थायिक आहेत. या भागातील लोकसंख्या दहा लाखांच्या वर असेल. या भागात समुद्र किनारा येतो. येथे पूर्वी रिकामा भूखंड होता, तेथे कालांतराने लोकांची वसाहत निर्माण झाली. पूर्वीपासूनच या किनाऱ्यावर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आर्थिक संपन्नता आली होती. त्यामुळेच या भागात बाजार आणि नवनवीन सुखसुविधाची उभारणी जलद गतीने होत गेली. म्हणून हाताला काही कामधंदा मिळण्याच्या हेतूने अनेक नागरिक याठिकाणी येऊ लागले. यात परराज्यातून आलेल्या लोकांचा समावेश आहे. काळानुसार हे लोक उत्तन येथील चौक जवळ असलेल्या मोकळ्या भागात छोटी घर करून राहू लागले. दरम्यान या काळात इंदिरा गांधीच्या पुढाकारामुळे ‘बांगलादेश’ राज्याची निर्मिती झाली होती. त्यामुळे बांगलादेश हा शब्द तेव्हा प्रचलित झाल्यामुळे स्थानिक मच्छिमारांनी चौक येथील एका छोट्या वस्तीला बांगलादेश असे टोपण नाव दिले होते. दुर्दैवाने तेव्हा पासून याच नावाची बोली ओळख या परिसराला मिळाली होती. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्डवर तसेच स्थानिक मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून या लोकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता बिलाचे देयकात पत्तामध्ये ‘बांगलादेश’ असाच उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या परिवहन सेवेच्या बस थांब्यावर देखील बांगलादेश असेच लिहिण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community